Breaking News

 

 

बंगळुरूमध्ये ‘एनआयए’कडून घातक शस्त्रसाठा जप्त

बंगळुरू (वृत्तसंस्था) : बंगळुरूमध्ये एनआयएने छापा टाकून अत्यंत घातक शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये ५ देशी हँडग्रेनेड, आयइडी आणि रॉकेट्स बनविण्याचे सामान, टायमर इत्यादी साहित्याचा समावेश आहे.  अटकेतल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारी एनआयएने बंगळुरूमध्ये ही कारवाई केली आहे.

एनआयएने काही दिवसांपूर्वी जमात उल मुजाहीद्दीन बांगलादेशचा दहशतवादी हबीबूर रहेमान याला अटक केली होती. रहेमानने पोलिसांच्या चौकशीत अनेक खळबळजनक माहिती दिली होती. बंगळुरूमध्ये सोलादेवन हिल्स या परिसरातल्या एका घरातून हे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

219 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा