Breaking News

 

 

चिखलफेकप्रकरणी नितेश राणे यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : महामार्ग उपअभियंत्याला शिवीगाळ करून त्याच्या अंगावर चिखलफेक केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचेसह २३ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश यांना ४ जुलै रोजी अटक झाल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपल्यामुळे नितेश यांना आज (मंगळवार) पुन्हा दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी मु्ंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने अंघोळ घातली होती. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधूनही ठेवण्यात आले होते. 

राणे यांच्या या कृतीचा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाकडून जोरदार निषेध करण्यात आला होता. नितेश राणे यांच्याविरोधात या कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेडेकर कुटुंबियांची भेट घेऊन राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

1,680 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा