Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – …तर ‘त्यांचा’ वाढदिवस पोलीसच करतील !

मध्यरात्री बारा वाजता अचानक गल्लीत फटाके वाजतात आणि एखाद्या टोळक्याची हुल्लडबाजी सुरु होते. कोणाचा तरी वाढदिवस असतो आणि तो काही वर्षांपूर्वी या दिवशी जन्माला आला म्हणजे या गावावर आणि देशावर उपकार झाले, असा या टोळक्याचा आविर्भाव असतो. हे थांबले पाहिजे असे एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने पोलिसांच्या बैठकीत सांगितले तेव्हा या अधिकाऱ्यांनी मला फोन करा, त्यानंतर त्यांचा वाढदिवस आम्हीच साजरा करु, असे सांगितले. तेव्हा या बैठकीत हास्याची आणि समाधानाची लकेर पसरली.

औद्योगिक वसाहती जवळच्या गावात नव्याने बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे स्वागत आणि सत्कार असा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला गावातील सरपंचांसह सर्वच क्षेत्रातील प्रमुख मंडळी उपस्थित होती. पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांपुढे सहकार्याची अपेक्षा केली. ग्रामस्थांनीही कायदा व सुव्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचे मान्य केले. संवाद आणि समन्वय कायम ठेवण्याचेही ठरले. त्याचवेळी एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने रात्री बाराच्या ठोक्याला होणारे वाढदिवस, त्यानंतरची आतषबाजी आणि हुल्लडबाजी याचा होणारा उपद्रव सांगून हे थांबवण्याची विनंती केली.

साहेबांनीही असे मध्यरात्री अचानक होणारे वाढदिवस आम्हाला त्वरित कळवा. त्यानंतर त्यांचा वाढदिवस आम्ही पोलीसच साजरा करु, असे सूचक आश्वासन दिले. तर आता वाढदिवस नेत्याचा असो, कार्यकर्त्याचा असो किंवा एखाद्याच्या लाडक्या बाळाचा या गावात रात्री-अपरात्री फटाके वाजणार नाहीत. हुल्लडबाजीने कुणाची झोपमोड होणार नाही अशी नागरिकांना अपेक्षा आहे. कारण साहेबांचा संदेशपर इशारा गावभर फिरला आहे.

633 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा