Breaking News

 

 

‘मखना’मुळे हनी सिंग अडचणीत…

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध गायक हनी सिंग याने खूप दिवसानंतर पुन्हा पार्श्वगायन क्षेत्रात पाउल ठेवले, मात्र ज्या ‘मखना’ गाण्यातून त्याने ‘कमबॅक’ केले, त्या गाण्यामुळे त्याच्यावर पंजाबमधील मोहाली येथील मटौर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गाण्यात महिलांबद्दल अश्लील आणि अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केल्यामुळे त्याच्याविरोधात अनेक कलमांतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत. 

(जाहिरात – शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो,

आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

पंजाबमध्ये ‘मखना’ गण्याला बॅन करण्यात यावे अशी मागणीही सध्या करण्यात येत आहे. हनी सिंगचे ‘मखना’ हे गाणे २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. टी-सीरीजच्या युट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. हनी सिंग लिखीत या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. 

या प्रकरणी राज्य महिला आयोगाने पंजाब पोलीस ठाण्यात आरोप देखील दाखल केले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी गृह सचिव आणि पोलीस उपअधिक्षकांना पत्र लिहून विरोध दर्शवला. आम्ही पोलिसांना सांगितले आहे की,’मखना’ गाण्यामध्ये महिलांबद्दल वापरण्यात आलेल्या अश्लिल शब्दांविरोधात एफआरआय दाखल करण्यात यावा’, असे त्या म्हणाल्या. 

477 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा