Breaking News

 

 

यादवनगर महिलांचा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका व्यावसायिक सलीम मुल्ला याच्या यादवनगर येथील अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर गोंधळ उडाला होता. यावेळी पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपात अटक केलेल्या या प्रकरणात संबंध नसलेल्या तरुणांना अटक केली आहे. त्यांना त्वरित सोडावे. या मागणीसाठी यादवनगर येथील महिलांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.

यादवनगर येथे मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्याने पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी या परिसरातील अनेक तरुणांना अटक केली आहे. तीन महिने झाले तरी त्यांची सुटका झालेली नाही. यामुळे या परिसरातील महिलांनी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना निवेदन देऊन या तरुणांच्या सुटकेची मागणी केली.

या निवेदनात, आमच्या मुलांचा या प्रकरणात कसलाही संबंध नसताना अटक केली असून त्यांची सुटका न झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा  प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या मुलांचे शिक्षण आणि भवितव्य धोक्यात आले आहे. जेलमध्ये असलेल्या मुलांनी नैराश्यातून आपल्या जीवाचे बरेवाईट करून घेतले तर त्याची जबाबदारी पोलीस खात्यावर राहील असा इशाराही दिला आहे.

या मोर्चात मासूम मुल्ला, आसमा मुल्ला, सुमन दाबडे, हसीना लाड, बेनझीर नदाफ, रेश्मा मुजावर, हसीना शेख, निगार नाचरे, शबनम मणेर आदींचा समावेश होता.       

1,493 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा