Breaking News

 

 

नागपूर विद्यापीठात शिकवला जाणार संघाचा इतिहास…

नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवला जाणार आहे. विद्यापीठाच्या बी. ए. च्या दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या इतिहासाचा समावेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. १८८५ ते १९७४  या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात देखील समावेश आहे. हा भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील शिकवले जाणार आहे. संघाचा इतिहास पहिल्यांदाच महाराष्ट्रातील विद्यापीठात शिकवला जाणार असल्याने या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा