Breaking News

 

 

विश्वचषक क्रिकेट : आजच्या सामन्यात ‘हा’ फॅॅक्टर निर्णायक…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज (मंगळवार) होत आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. उद्याचा दिवस राखून ठेवला आहे. मात्र या सामन्यात नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या विश्वचषकातील सामन्यांच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला असता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने सामन्यात बाजी मारली आहे.

आजच्या उपांत्य सामन्यातही नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. धावांचा पाठलाग करण्यात भारतीय संघ इतर संघाच्या तुलनेत आघाडीवर आहे. पण या विश्वचषकात असे पहायला मिळालेय की धावांचा पाठलाग करताना प्रत्येक संघाला कसरत करावी लागली आहे. त्यामुळे कोणताही संघ दुसऱ्यांदा फलंदाजी करायची टाळत आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्याने पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण पाऊस आल्यास दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला डकवर्थ-लुईसच्या नियमाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करील, हे उघड आहे.

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने अनेक अशक्यप्राय विजय मिळवले आहे, मात्र विश्वचषक स्पर्धेचा हा उपांत्य सामना असल्याने कोणताही संघ धोका पत्करेल असे वाटत नाही.

1,008 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा