Breaking News

 

 

विद्यार्थ्यांना अधिक भौतिक सुविधा देण्यासाठी मास्टरप्लॅन : अंबरिश घाटगे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : लाखो गुणवंत विद्यार्थी घडविणारी एम.आर. हायस्कूलचा जिल्हा परिषदेला अभिमान आहे. दोनच वर्षात ही शाळा वाटचालीची शंभरी पूर्ण करणार आहे. या प्रशालेत विद्यार्थ्यांना अधिक भौतिक सुविधा देण्यासाठी मास्टरप्लॅन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी आज (सोमवार) प्रतिपादन केले. 

यावेळी एमआर हायस्कूलच्या मैदानावर प्रेक्षक गॅलरीचा पायाभरणी शुभारंभ अंबरिश घाटगे याच्या हस्ते करण्यात आला. शाळेच्या विकास निधीतून ३० लाख रुपये खर्चून गॅलरी उभारण्यात येत आहे. पंचायत समिती सभापती विजय पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

घाटगे म्हणाले,  जि. प. च्या शाळा टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परंतु, गुणवत्तेच्या जोरावर नवी आव्हाने पेलण्यासाठी प्रयत्न करीत  आहेत. पालकांच्या सहभागातून जिल्ह्यात तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी उभारून सुविधा देण्यात आल्या आहेत. एम.आर. प्रशालेच्या विकासासाठी  माजी विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक आणि अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन मास्टर प्लॅन करणार असल्याचे सांगितले.

जि.प. सदस्य सतीश पाटील म्हणाले, गेली कित्येक वर्षे  एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होतात. त्यासाठी गडहिंग्लज युनायटेड आणि शहरातील तरुण मंडळांची प्रेक्षक गॅलरीची केलेली माझी मागणी आज सर्वांच्या प्रयत्नातून साकारत आहे.

यावेळी पं. स. उपसभापती विद्याधर गुरबे, जि.प. सदस्य प्रा. अनिता चौगुले,  नगराध्यक्षा स्वाती कोरी, जि.प. सदस्य सौ. राणी खमलेटटी, सुनिता रेडेकर, पं. स. सदस्य विठ्ठल पाटील, प्राचार्य एस. एन. नाईक, नगरसेविका शशिकला पाटील, नरेंद्र भद्रापुर यांच्यासहीत मान्यवर उपस्थित होते.

867 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा