Breaking News

 

 

‘गोकुळ मल्टीस्टेट’बाबत अरुण डोंगळेंची भूमिका योग्यच : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या मल्टीस्टेटबाबत ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यांना ही भूमिका घ्यायला थोडा उशीर झाला, पण हरकत नाही. त्यांनी योग्य तेच मत मांडले आहे. माझा देखील गोकुळच्या मल्टीस्टेटला विरोध आहे आणि राहणारच, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे व्यक्त केली.

शेट्टी म्हणाले की, गोकुळ संघ मल्टीस्टेट करावा की न करावा याबाबतीत जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे मत घेतले तर फार मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक मल्टीस्टेटच्या विरोधात आपले मत व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. दूध उत्पादकांचा गैरफायदा संचालक मंडळ घेत असून ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

3,960 total views, 3 views today

One thought on “‘गोकुळ मल्टीस्टेट’बाबत अरुण डोंगळेंची भूमिका योग्यच : राजू शेट्टी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा