Breaking News

 

 

क्रिकेट वर्ल्ड कप : उपांत्य फेरी न खेळताही भारत अंतिम फेरीत..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्य फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ पोचले आहेत. गुणतक्त्यात अग्रस्थानी असणारा भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातो. मात्र, उपांत्य फेरी न खेळता भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहचू शकतो. कसे ते जाणून घेऊ.

(जाहिरात – शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो,

आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या या महत्त्वाच्या स्पर्धेतील ४५ पैकी ७ सामने पावसाच्या तडाख्यात वाहून गेले आहेत. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर मंगळवारी (९ जुलै) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना होणार आहे. मात्र या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. ब्रिटनच्या हवामान विभागाने मंगळवारी हवामान ढगाळ राहणार असून हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे. मात्र जर पाऊस जोरदार कोसळला तर त्या दिवशी सामना होणे कठीण आहे.

स्पर्धेच्या नियमानुसार, साखळी सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यास दोन्ही संघांना एक गुण दिला जातो. मात्र उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात येतो. बुधवार (१० जुलै) या राखीव दिवशी सामना झाला तर त्या दिवशीही वातावरण ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. परिणामी बुधवारीही पाऊस कोसळला तर दोन्ही देशांना आणखी एक दिवस पुन्हा मिळणार नाही. भारत आपोआपच अंतिम फेरीमध्ये पोहोचेल, कारण भारताच्या खात्यात १५ गुण आहे तर न्यूझीलंडच्या खात्यात ११ गुण आहेत. म्हणजेच गुणानुक्रमानुसार भारताला अंतिम फेरी खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे वरुणराजाची कृपा झाल्यास विराट सेना थेट अंतिम फेरीत खेळताना दिसू शकेल.

अर्थात या शक्यता ‘जर तर’ च्या आणि पावसावर अवलंबून आहेत. चाहत्यांना मात्र हा सामना व्हावा, अशी अपेक्षा आहे.

8,478 total views, 3 views today

2 thoughts on “क्रिकेट वर्ल्ड कप : उपांत्य फेरी न खेळताही भारत अंतिम फेरीत..?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा