Breaking News

 

 

‘गली बॉय’चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव…

मुंबई (प्रतिनिधी) : झोया अख्तर दिग्दर्शित, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटाला दक्षिण कोरियामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

दक्षिण कोरियामध्ये २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅटास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये (बीआयएफएएन) या चित्रपटाला ‘नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशियन सिनेमा’ (एनइटीपीएसी) हा पुरस्कार मिळाला आहे.

एनइटीपीएसीमधील काही सदस्य आणि कलाविश्वातील दिग्गज व्यक्ती यांचा समावेश एनइटीपीएसी निवड समितीमध्ये असतो. ही समिती वर्ल्ड फॅटास्टिक ब्लू सेक्शनमधून सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाची निवड करतात. ही निवड करताना विनोदीपट, ड्रामा या प्रकारामध्ये मोडणारे आणि नव्या धाटणीचे व आशयपूर्ण चित्रपटांचा विचार करण्यात येतो.

210 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा