Breaking News

 

 

निराशाजनक अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात घसरण सुरूच…

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शेअर बाजारात आज (सोमवार) पुन्हा एकदा मोठी घसरण पहायला मिळाली. शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ६६५ अंकांनी घसरून ३८,८४८.५४ वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही २०५ अंकांची घसरण पहायला मिळत आहे.

(जाहिरात – 🏼 आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

२५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर. 📞  फोन – (०२३१) २६२७५७९)

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली होती. आता शेअर बाजाराच्या ३० पैकी २५ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ५० पैकी ४४ शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर बाजारावर झाला असल्याचे मत काही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान पीएनबीच्या शेअर्समध्येही १०  टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एल अँड टी, मारूती आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. तेल कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम झाल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

303 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा