Breaking News

 

 

अमरनाथ यात्रेवरून मुफ्ती पुन्हा बरळल्या…

श्रीनगर (वृत्तसंस्था) : फुटीरवाद्यांचा नेहमीच कळवळा असलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आता हिंदूंच्या पवित्र श्री अमरनाथ यात्रेविषयी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. अमरनाथ यात्रेला आमचा पाठिंबा आहे, मात्र या वेळी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे स्थानिक जनतेला त्रास सोसावा सहन करावा लागत आहे, असे त्यांनी म्हटले  आहे.

(जाहिरात –  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

 अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

 २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

 ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.  फोन – (०२३१) २६२७५७९)

अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून सुरुवात झाली. आतापर्यंत ९० हजार भाविकांनी यात्रा पूर्ण केली आहे. याच संदर्भात त्या म्हणाल्या की, यात्रेला आमचा पाठिंबा आहे, परंतु या यात्रेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो. सुरक्षेच्या निमित्ताने काश्मीरमधील स्थानिक नागरिकांना या यात्रेचा त्रास सोसावा लागतो. अमरनाथ यात्रेला लाखो भाविक येत असतात. दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे.

काही वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांवर हल्ला केला होता. यामध्ये काही भाविकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून केंद्र सरकारने भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. भाविकांची सुरक्षा महत्त्वाची असतानाही मुफ्ती यांनी असे वक्तव्य केल्याने भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

408 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा