Breaking News

 

 

गिजवणेत गुणवंत विद्यार्थांचा सत्कार…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गिजवणे (ता.गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि गिजवणे ग्रा.पं. यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भाग्यश्री पाटील होत्या.

जि.प. सदस्य सतीश पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सतीश पाटील यांनी अपार कष्टाच्या जोरावर गिजवणेतील विद्यार्थानी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. अशा विद्यार्थांच्या पाठीशी आपण उभे असल्याचे सांगितले.

यावेळी उपसरपंच सुवर्णा पाटील, ग्रामविकास अधिकारी डी बी कुंभार, नारायण कुंभार, नामदेव गायकवाड, रंजना कुंभार, अरविंद पाटील, अशोक लोखंडे, नागोजी चव्हाण, नितीन पाटील यांच्यासह ग्रामस्थ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

909 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा