Breaking News

 

 

उद्योजकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार : खा. छ. संभाजीराजे

टोप (प्रतिनिधी) :   उद्योजकांचे शासकीय, निमशासकीय धोरणात्मक प्रश्न, औद्योगिक  विजदरवाढ कमी करण्यासाठी व उद्योगासंबंधी असणारे विविध प्रश्ने सोडवणली जातील, असे मत खा.  छ. संभाजीराजे यांनी व्यक्त केले. ते   शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनला सदिच्छा भेटीमध्ये बोलत होते.

यावेळी खा. छ. संभाजीराजे यांनी स्मॅकला भेट देवून कोल्हापूर मधील उद्योग व्यावसायामधील सध्याची स्थिती आणि अडचणींवर उद्योजकांच्या बरोबर चर्चा केली. तर स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी त्यांचे उद्योजकांचे विविध प्रश्न मांडून काही मागण्यांचा पाठपुरावा सरकारकडे करावा, अशी मागणी केली. यामध्ये उद्योग विस्तारासाठी जागा,  वीजेच्या दराची समस्या कामगारांना वैद्यकीय सेवा, विमान सेवा, कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय फौंड्रीता दर्जा, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग आदी मागण्या खा. संभाजीराजे यांच्याकडे करण्यात आल्या.

खा. छ. संभाजीराजे म्हणाले, उद्योजकांचे जे प्रलंबित प्रश्न असतील तर त्याबाबत उद्योगमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांना भेटून हे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू. कोल्हापूरमध्ये अजून मोठे उद्योग कसे येतील याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी स्मॅकचे  जेष्ठ संचालक सुरेंद्र जैन, प्रशांत शेळके, जयदीप चौगुले, दिपक परांडेकर, सोहन शिरगांवकर, दीपक पाटील,  सचिन पाटील, अमर जाधव, जयदत्त जोशीलकर, प्रविण पटेल, शेखर कुसाळे, राजू वारनुळकर, नामदेव पाटील, बदाम पाटील, फारूक हुदली, सेक्रेटरी टी. एस. घाटगे, अतुल पाटील उपस्थित होते.

354 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा