Breaking News

 

 

‘कबीर सिंग’ची कमाई २२६ कोटींच्या घरात…

मुंबई (प्रतिनिधी) : ‘कबीर सिंग’ चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. यंदाच्या वर्षीच्या ‘अडल्ड’ चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या ‘कबीर सिंग’च्या कमाईचा आकडा सलग चढत्या क्रमावर आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

मागील दोन आठवड्यांपासून कबीरच्या उध्वस्त झालेल्या प्रेमाची कहाणी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी स्टार चित्रपटाची लोकप्रियता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. चित्रपट सलग १६व्या दिवशी २२६.११ कोटींच्या घरात पोहोचला आहे.

‘कबीर सिंग’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल १३२.४२ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १९८.९५ कोटींच्या घरात पोहोचला. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. 

त्याचबरोबर ‘पद्मावत’, ‘सुलतान’, ‘संजू’, ‘बजरंगी भाईजान’, ‘टायगर जिंदा है’ या एकापेक्षा एक चित्रपटांना देखील ‘कबीर सिंग’ चित्रपटाने मागे टाकले आहे. भारत देशात ‘कबीर सिंग’ एकूण ३ हजार १२३ चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘कबीर सिंग’ चित्रपट २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

486 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा