Breaking News

 

 

हरियाणाच्या ‘ या ’ डान्सरचा भाजपमध्ये प्रवेश…

नवी दिल्ली : हरियाणवी डान्सर सपना चौधरीने आज (रविवार) दिल्लीमध्ये झालेल्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सपनाने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

(जाहिरात – शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो,

आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

लोकसभा निवडणुकीदरम्यान मनोज तिवारी यांच्या प्रचारमोहिमेत सपना सहभागी झाली होती. तेव्हापासूनच ती भाजपामध्ये प्रवेश करण्याचे बोलले जात होते.

लोकसभा निवडणुकीदरम्यान, सपनाने प्रियंका गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केल्याने सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यावेळी देखील सपनाने ती कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगितलं होते. मात्र आता, अखेर सपनाने भाजपमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

606 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा