Breaking News

 

 

निवृत्तीवरून ‘नाराज’ धोनीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

लंडन (वृत्तसंस्था) : विश्वचषक स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारेल, अशा चर्चा सुरू आहेत. अनेकांच्या मते ही धोनीची अखेरची स्पर्धा असेल. धोनीच्या फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळेच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्यास कोणाला आश्चर्यही वाटणार नाही. पण, धोनीनेच त्याच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीवर  धोनीन त्याच्या निवृत्तीबद्दल सांगितले आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

तो म्हणाला,”मी कधी निवृत्त होईन, याची मलाही कल्पना नाही. पण, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी मी निवृत्त व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे.” त्याने या विधानातून संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. धोनीनं निवृत्त व्हावे अशीच त्यांची इच्छा असल्याचे, अप्रत्यक्षितरित्या धोनीला सुचवायचे आहे. त्यामुळे आता धोनी विरुद्ध व्यवस्थापक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत धोनीचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येत असला तरी त्याला फलंदाजीमध्ये अपेक्षित चमक दाखवता आलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत केलेली अर्धशतकी खेळी ही त्याची या स्पर्धेतील एकमेव मोठी खेळी ठरली आहे. त्यामुळे, सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला असून, या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे वृत्त पीटीआयने काही दिवसांपूर्वी दिले होते.

1,635 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा