Breaking News

 

 

पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत वाढ…

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. याच्या दुसऱ्या दिवशीच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका पहायला मिळत आहेत. आज (शनिवार) पेट्रोलच्या किंमतीत २.४५ प्रति लीटरने वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत ७२.९६ रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोलच्या किंमती सोबत डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलचे दर ६६.६९ रुपये प्रति लीटर झाले आहेत. 

मुंबईत आज (शनिवार) पेट्रोल ७८.५७ रुपये प्रति लीटर दराने विक्री होत आहे. तर डिझेल ६९.९०  रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस आणि एक्साइज ड्यूटी वाढवण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर सरकारतर्फे १ रुपया प्रति लीटरप्रमाणे सेस लावण्यात आला आहे. तसेच पेट्रोल १ रुपया प्रति लीटर हिशोबाने एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा