Breaking News

 

 

अर्थसंकल्पात सार्वजनिक गृहनिर्माणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आनंददायी : राजीव परीख

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुरातन भाडे कायद्यात सुधारणा करून सरकारी जमिनींवरील सार्वजनिक गृहनिर्माणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आनंददायी असल्याची प्रतिक्रिया क्रेडाईचे राज्य अध्यक्ष राजीव परीख यांनी आज (शुक्रवार) दिली.

परीख म्हणाले, क्रेडाईने यासंबंधी अऩेक वेळेला मागणी केली होती. त्याच नोंद घेऊन प्रोत्साहन देण्याची भूमिका अर्थमंत्र्यांनी घेतली. घर खरेदीसाठी २ लाखांपासून व्याजावर  १.५० लाखांची  अतिरिक्त कपात मिळणार आहे. यामुळे एकूण लाभ ३.५ लाखांपर्यंच पोचेल. ग्राहकांना ७ लाखांचा निव्वळ नफा होईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवल पुरवणे, कॉर्पोरेट बाँड्समधील सुधारणा, सुस्थितीतील एनबीएफसीच्या उच्च मूल्यांच्या एकत्रित मालमत्ता विकत घेण्यासाठी  सरकारकडून बँकांना १ लाख कोटींची हमी यामुळे तरलतेचे संकट कमी होण्यास मदत होऊ शकते. 

गृहनिर्माण वित्त कंपन्यांचे नियमन पुन्हा आरबीआयकडे आल्याने जमिनीसाठी वित्तपुरवठा, गृहनिर्माण वित्त पुरवठ्याला प्राथमिकता देणे आणि निधी पुरवठ्यासाठी कमी खर्च अशा रिअल इस्टेट सेक्टरमध्ये अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आरबीआय करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

282 total views, 3 views today

One thought on “अर्थसंकल्पात सार्वजनिक गृहनिर्माणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आनंददायी : राजीव परीख”

  1. Excellent decision by central finance ministers,Dear Rajiv sir we appreciate your efforts for same.Thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा