Breaking News

 

 

गडहिंग्लजमध्ये नाट्य चळवळ रुजविण्यासाठी अकादमीची स्थापना : शिवाजी पाटील

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज उपविभागात नाट्य चळवळ रुजविण्यासाठी ‘गडहिंग्लज कला अकादमी’ ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रा.शिवाजी पाटील यांनी आज (गुरुवार) दिली.             

यावेळी प्रा.पाटील म्हणाले, गडहिंग्लज हे नाट्यचळवळीचा नावाजलेला तालुका म्हणून ओळखला जातो. पण सध्या नाट्यचळवळीला बळ मिळत नाही. त्यामुळे अनेक कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. अशा कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने  कला अकादमीची स्थापना केली आहे. या कला अकादमीत नाट्य, अभिनय, नृत्य,चित्रपट क्षेत्राशी निगडीत माहिती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्तम व्यासपीठ तयार होईल.

तसेच  चित्रपट क्षेत्राशी निगडित असणाऱ्या नामवंत कलाकारांच्याकडून इथल्या कलाकारांना प्रशिक्षण देण्याचा देखील आमचा मानस आहे. यासाठी संजय हळदीकर, डॉ.संजय तोडकर, संजय मोहिते, दिग्दर्शक अजय कुरणे नाट्यदिग्दर्शक अतुल पोटे यांच्यासह अनेक कलाकारांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रा.निलेश शेळके, प्रा. अशपाक मकानदार, प्रा.संतोष देसाई उपस्थित होते.

939 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा