Breaking News

 

 

जोधपूर कोर्टाने ‘सलमान’ला खडसावले…

जोधपूर (वृत्तसंस्था) : काळवीट शिकारप्रकरणी पुढील सुनावणीच्यावेळी जर कोर्टात हजेरी लावली नाही तर जामीन रद्द करण्यात येईल, अशा कडक शब्दांत अभिनेता सलमान खान याला जोधपूरच्या कोर्टाने खडसावले आहे. आज (गुरुवार) या खटल्याची सुनावणी होती. मात्र, सलमानने कोर्टात हजेरी लावली नाही. या खटल्याची पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

वीस वर्षांपूर्वी १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान सलमान खान आणि त्याचे सहकलाकार सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांच्यावर जोधपूरमधील कांकाणी गावात एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी जोधपूर सेशन कोर्टाचे मुख्य न्यायाधीश देवकुमार खत्री यांनी काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर सलमान खानने सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जिल्हा आणि सेशन कोर्टात अपील केली होती. ७ एप्रिलला जिल्हा आणि सेशन कोर्टाने सलमानविरोधात सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

510 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा