Breaking News

 

 

आर्थिक विकास दर ‘७’ टक्के राहण्याचा अंदाज : अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प उद्या (शुक्रवार) मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आर्थिक पाहणीचा अहवाल सादर केला. त्यामध्ये २०१९-२० साठी देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पाहणी अहवाल मांडताना वित्तीय तूट ६.४ वरुन ५.८ आली असल्याची माहिती दिली. तसेच २०१९-२० मध्ये इंधन दर घटण्याची शक्यता व्यक्त केली. २०१९-२० साठी देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) आर्थिक विकास दर ६.८ टक्के होता. आर्थिक पाहणी अहवालात गुंतवणूक आणि विक्रीत वाढ आणि बांधकाम क्षेत्रातही गती येईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार उल्लेख होणाऱ्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्धिष्ट साध्य करण्यासाठी विकास दर आठ टक्के असणे गरजेचं आहे. हा विकास दर कायम राहिल्यास आपण सर्वात जलद अर्थव्यवस्था ठरत चीनलाही मागे टाकू शकतो.

234 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा