Breaking News

 

 

चाटे शिक्षण समुह : कोल्हापूर विभागातर्फे ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चाटे शिक्षण समुहाचे संस्थापक प्रा. मच्छिंद्र चाटे आणि कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांच्या ५ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर, सांगली, सातारा येथील चाटे स्कूल अँड ज्यु. कॉलेजच्या संकुलांमध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीने हा संकल्प राबविण्यात येणार आहे.

चाटे शिक्षण समुह कोल्हापूर विभागामार्फत शैक्षणिक गुणवत्ते सोबतच कला, क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. प्रा. डॉ. भारत खराटे यांनी १९९७ मध्ये अवघ्या चार सहकाऱ्यांच्या मदतीने कोल्हापूर विभागामध्ये चाटे शिक्षण समुहाची मुहूर्तमेढ रोवली आणि दहावी, बारावी, मेडिकल, इंजिनिअरींग अशा अनेक क्षेत्रामध्ये गुणवत्तेचे नवनवीन मापदंड तयार केले. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवंत बनविण्यासाठी चाटे पॅटर्नने नेहमीच मदत केली आहे.

सन २००३ पासून स्कूल आणि कॉलेजच्या माध्यमातून शाळा-कॉलेजचा पाया घातला जाऊन याठिकाणी शंभर टक्के निकालाची परंपरा राबवली आहे. स्वतः मोठी स्वप्ने पाहणारे आणि इतरांना ती पहायला लावणारे प्रा. खराटे एक मोठा उर्जास्त्रोत्र आहेत. आत्तापर्यंतच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन जेम्स ऑफ इंडिय़ा, आर्च ऑफ एक्सलन्स, अविष्कार फाऊंडेशनचा जीवनगौरव आणि रोटरी क्लबचा बेस्ट सेक्रेटरी अॅवार्ड असे विविध सन्मान मिळाले आहेत. कोणताही विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर राहू नये यासाठी सरांचे प्रा. खोराटे यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहे.

हजारो विद्यार्थ्यांसह शेकडो सहकाऱ्यांचे प्रेरणास्थान असलेल्या प्रा. डॉ. खोराटे यांचा प्रचंड आत्मविश्वास, सळसळता उत्साह आणि नाउमेद न होण्याची ताकद सर्वांना मिळते. प्री-आयएएस स्कूल, चाटे फाऊंडेशन स्कूल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी हेच पाठबळ त्यांना मिळेल, यात शंका नाही.

2,023 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा