Breaking News

 

 

प्रादेशिक भाषांत उपलब्ध होणार उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बऱ्याच वर्षांपासून उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांत उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. याला यश आले असून आता निकालपत्र मराठी, हिंदी, कन्नड, आसामी, उडिया, तेलुगू भाषेत उपलब्ध होणार आहे.

आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर इंग्रजी भाषेत निकालपत्र अपलोड करण्यात येत होते. मात्र, ते आता मराठी, हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तेलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे. हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुरुवातीला ५०० पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षिप्त स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जुलैच्या अखेरीस हिंदी आणि मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होतील. त्यामुळे सामान्य पक्षकाराला काही प्रमाणात का होईना, निकालाची माहिती मिळणार आहे.

330 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा