Breaking News

 

 

अभिमानास्पद : अमेरिकेकडून भारताला आणखी एक महत्त्वाचा दर्जा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकन संसदेने आज (मंगळवार) भारताला नाटो देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी संरक्षण सामग्री खरेदी करू शकणार आहे. सिनेटर जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांनी अमेरिकेच्या संसदेत हे विधेयक सादर केले होते. भारताबरोबर परस्पर सहकार्य, दहशतवादाविरोधात लढा, काऊंटर पायरसी आणि समुद्री सुरक्षेवर भारताबरोबर काम करण्याची आवश्यकता असल्याचे यात नमूद करण्यात आले होते.

नॅशनल ‘डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्ट’ला अमेरिकेच्या सिनेटने मागील आठवड्यातच मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या विधेयकातील संशोधनाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. नाटो देशांच्या यादीत भारताला समावून घेणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. तसेच भारत आणि अमेरिका या देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत ‘हिंदू अमेरिकन फौडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कालरा यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा