Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापूरी ठसका – आता मराठ्यांनी कर्तृत्व दाखवावे…

एका दिर्घ लढ्यानंतर अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळाले. शिक्षणात १२ आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण असणार आहे. केवळ आरक्षणामुळे मराठा समाजाची अधोगती थांबेल का ? हाच खरा प्रश्न आहे. यासाठी मराठा समाजाने काही बाबतीत जाणीवपूर्वक बदल करण्याची गरज आहे. आता कर्तृत्व दाखवण्याची गरज आहे.

(जाहिरात – ✍🏼 आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

🏢 २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

👥 ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

🚩 पत्ता खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.

📞 फोन – (०२३१) २६२७५७९)

समाजरचनेत मराठी माणूस अन्य समाजातील लोकांना मोठा भाऊ मानला जायचं. शेती हाच त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होता. कृषी संकल्पनेत बारा बलुतेदार आणि अठऱा आलुतेदारांचा मराठा समाजच आधार होता. मराठा समाजातील काही कुटुंबांनी नशिबाशी आणि पत्थराशी टक्कर देत समृद्धी मिळवली. पाटीलकी बरोबरच राजकाराणतही महत्वाची पदे मराठा समाजाकडेच होती. दुसऱ्याबद्दल त्याच्या मनात सहानुभूती असायची. दुसऱ्याचे दुखः हेरुन त्याला मदतीचा हात द्यायचा.

पण नंतरच्या काळात मराठा समाजाला कर्तृत्वाचा विसर पडला, आणि अहंमपणा वाढला. अनेक ‘नाद’ त्याला भोवले. पद, प्रतिष्ठा गेली. आता स्वतःच्या हाताने दारिद्र्य ओढवून घेतले. अन्य समाजाचा आधार असलेल्यांनी स्वार्थापोटी स्वतःच्या भावांबरोबरही वैर पत्करले. राजकारण महत्वाचे वाटू लागले. मराठा समाजाचे अंतर्गत विभाजन झाले, ताकद कमी झाली. एकीचा अभाव राहिला. भविष्याचा वेध घेता आला नाही. अनेक कुटुंबांमध्ये वाद होऊन शेतजमिनीचे तुकडे पडले. जमीनदार अल्पभूधारक झाले.

मराठा समाजाला भाऊबंदकीचा शाप आहे. भाऊबंदकी नाही, असे एक गाव सापडणार नाही. ‘स्व’चाच विचार होऊ लागला. चूक असले तरी आपलेच घोडे पुढे दामटण्याची परंपरा सुरु झाली. स्वतः स्वार्थासाठी स्वजनांनाच खड्ड्यात घालण्याचे प्रकार वाढले.

दुसऱ्याचे यश डोळ्यात खुपण्याची एक वाईट सवय मराठा समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. दुसरा प्रगतीच्या दिशेने चालला की त्याचे पाय ओढणारे दुसरे कोणी नसते, तर ‘स्वकीय’च असतात. मीच श्रेष्ठ बाकी सगळे कनिष्ठ, अशी भावना बाळगली जाते.

मराठा समाज आणखी एका कारणाने खड्ड्यात गेला आहे. तो म्हणजे खोटी प्रतिष्ठा. त्यापोटी अनेकांनी स्वतःच्या कुटुंबाला दुखःच्या खाईत लोटल्याची अनेक उदाहरणे आहेत. बारश्यापासून ते बाराव्या पर्यंत आपला रुबाब राहीला पाहिजे, या खोट्या प्रतिष्ठेसाठी जमिनी विकल्या आणि भिकेकंगाल झाले. इर्षा, भाऊबंदकी, खोटी प्रतिष्ठा अशा अवगुणांना तिलांजली देऊन एकीचे दर्शन घडवण्याचे आणि स्वतःचे कर्तृत्व दाखवण्याची वेळ आली आहे.

अन्यथा आरक्षणाची कुबडी सर्वांनाच तारुण नेईल, हा केवळ भ्रम ठरेल. काहीवेळा बुडत्याला काडीचा आधार ठरतो. मात्र स्वतःही हातपाय हलवावे लागतात. याचे भान ठेऊन कर्तृत्व सिद्ध करावे लागेल. नाहीतर ये रे माझ्या मागल्या सारखी अवस्था होईल. आणि मराठा समाजाची अधोगती अन्य कोणताही पर्याय रोखू शकणार नाही. काही पिकत नाही, पदरात काही पडत नाही, असे रडगाणे गाण्याऐवजी शेती या हक्काच्या क्षेत्रात नाविण्य आणून प्रगतीची कास धरावी. शेतजमीन विकणे हा पर्यायच असू शकत नाही. आरक्षणाच्या संधीचा फायदा मराठा समाजाने घ्यावा, मात्र कर्तृत्वही दाखवायला हवे.

ठसकेबाज

408 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा