Breaking News

 

 

म्युझिक थेरपी संशोधनात डॉ. पत्की यशस्वी होतील : प्यारेलाल

कोल्हपूर (प्रतिनिधी) : डॉ. सतीश पत्की यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये केलेले कार्य मी पाहिले आहे, ते खूप ग्रेट आहेत. म्युझिक थेरपी ही नवीन संकल्पना मांडत एक वेगळे संशोधन हाती घेतले आहे. या संशोधनात त्यांना चांगले यश मिळेल, असा मला ठाम विश्वास वाटत असल्याचे प्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल यांनी सांगितले. ते आज (सोमवार) पत्की हॉस्पिटल येथे बोलत होते.

पत्की हॉस्पिटल व रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने ‘डॉक्टर डे’ दिनाचे औचित्य साधत ‘गरोदर महिला व म्युझिक थेरपी’ या संशोधन प्रकल्पाचा शुभारंभ संगीतकार प्यारेलाल यांच्या हस्ते झाला.

यावेळी प्यारेलाल म्हणाले, डॉ. पत्की यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात फार बारकाईने निरीक्षण केले आहे. स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. शिवाय त्यांनी संगीताचा वापर या वैद्यकीय क्षेत्रात कसा होऊ शकतो, याचा अभ्यास केला असून ही कौतुकाची बाब आहे. अशा या व्यक्तीच्या मी प्रेमात पडलो तर चुकीचं ठरु नये, असे म्हणत प्यारेलाल यांनी डॉ. पत्कींचा गौरव केला.

डॉ. पत्की म्हणाले, प्राचीन काळापासून संगीताचे मानवी आरोग्याशी फार जवळचे नाते आहे. प्लुटो या विचारवंताने म्हटले आहे की, औषधामुळे शारीरिक विकार बरे होतात तर संगीतामुळे मानसिक संतुलन सुधारते. मधुर संगीताच्या श्रवणामुळे मेंदूमधील सर्वच केंद्रांना उत्तेजन मिळते व शारीरिक तसेच मानसिक आरोग्याला चांगली चालना मिळते. चांगले संगीत ऐकल्यानंतर मेंदूमधून एंडोर्फिन व डोपामाइन या अंत:स्त्रावाची निर्मिती होते. या सर्वांमुळे मनामध्ये चांगले भाव निर्माण होतात व ‘फील गुड’ वातावरणाची निर्मिती होते. हृदयाचे विकार रक्तदाब श्वसनाची गती पचनसंस्था व भावनांचे योग्य नियोजन या सर्वांसाठी चांगले संगीत ऐकणे हा एक महत्त्वाचा उपचार समजला जातो. या पार्श्‍वभूमीवर सुश्राव्य संगीत ऐकण्याचे फायदे गरोदर महिला तसेच अर्भकावर काय होतील अशी उद्दिष्टे समोर ठेवून या प्रकल्पाचे पत्की हॉस्पिटलमध्ये नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. पत्की यांच्या पत्नी उज्वला पत्की यांनी प्यारेलाल आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा अंबाबाईची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार केला. यावेळी पत्की कुटुंबीय, डॉक्टर, संगीत रसिक उपस्थित होते.

420 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा