Breaking News

 

 

काश्मीरमध्ये दरीत बस कोसळून ३३ ठार : २२ जखमी

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून ३३ प्रवासी ठार तर २२ जण जखमी झाले आहेत. केशवानहून किश्तवाडकडे चाललेली ही बस दरीत कोसळली. या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितले की, या अपघातात ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

708 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा