Breaking News

 

 

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे : अजित देसाई

गारगोटी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते. त्यामुळे आजचा विद्यार्थी हाच भविष्याची राष्ट्रशक्ती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माजी उपसभापती अजित देसाई यांनी केले. ते कुर (ता. भुदरगड) येथे झालेल्या  गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारावेळी बोलत होते.

यावेळी राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन अध्यक्ष दिलीप खाडे,  प्रमुख पाहुणे दिपक मेंगाणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी, शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.               

देसाई म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकासासाठी शालेय जीवनातील शिक्षण महत्वाचे असते. बौद्धिक विकासाबरोबर शिक्षकांनी क्रिडा क्षेत्रात ही वेळ दिला पाहिजे. जेणेकरून त्याला त्यांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण घेता येईल, असे सांगितले.

यावेळी सरपंच अनिल हळदकर, अध्यक्ष दिलीप खाडे, मुख्याध्यापक डी.डी. कडव, एकनाथ मोरे यांनी ग्रा.पं.सदस्य तानाजी पाटील, संदीप पाटील, सुनिल हळदकर, उज्वला खाडे, रंगराव कांबळे, ग्रामसेवक सचिन बारड, शाळा व्यवस्थापन सदस्य सरिता हळदकर, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. 

429 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा