Breaking News

 

 

सरकारी बैठकीतून ‘बिस्किटे’ हद्दपार : आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  आता सरकारी बैठकीतून चहासोबतच्या बिस्किटांना हद्दपार करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी हा निर्णय घेतला आहे. आता बिस्किटांऐवजी नेते आणि अधिकाऱ्यांना चणे, बदाम आणि अक्रोड खायला देण्यात येणार आहेत.

सरकारी बैठकीत चहा आणि बिस्किट हे आघाने येतेच. पण आता चहासोबतची बिस्किटांची गट्टी तुटण्याची शक्यता आहे. सरकारी बैठकीतून बिस्किटांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सरकारी बैठकीत चहासोबत बिस्किट न देण्याचा निर्णय घेतला आहे.

बिस्किटातल्या मैद्यामुळे शुगर वाढते, तसंच लठ्ठपणाही वाढतो. आरोग्यदायी सवयींची आता आरोग्य मंत्रालयापासूनच सुरुवात करण्यात आली आहे. आता सरकारी बैठकीत लाह्या, चणे, भाजलेले चणे, खजूर, बदाम आणि अक्रोड दिले जाणार आहेत. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं डॉक्टरांनी स्वागत केलं आहे. तसेच प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्याही न ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

456 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा