Breaking News

 

 

उषाराजे हायस्कूलतर्फे स्वच्छता मोहिम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ताराराणी विद्यापीठातर्फे स्वच्छ व सुंदर कोल्हापूर या महापालिकेच्या उपक्रमातंर्गत उषाराजे हायस्कूल परिसरात आज (शनिवार) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी महास्वच्छता अभियानातंर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

मुख्याध्यापिका सौ. एम.व्ही.जाधव यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. विद्यार्थींनी आणि शिक्षकांनी हायस्कूल परिसराची स्वच्छता केली. तसेच स्वच्छता विषयक घोषवाक्यांचे फलक लावून विद्यार्थींनींना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. महास्वच्छता अभियान रॅलीत विद्यार्थींनींनी स्वच्छता विषयक घोषणा देऊन परिसरात जनजागृती घडवून आणली. स्वच्छता दूत सौ. वर्षा मस्के यांनी स्वच्छता, आरोग्य आणि आपली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी उपमुख्याध्यापिका सौ. ए.यु.साठे, पर्यवेक्षिका सौ. एस.डी. चौधरी, सौ. व्ही.डी. जमेनीस आणि शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते.

252 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा