Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – महापालिका…कुरघोडीच्या राजकारणाचा अड्डा…

राजकारण आणि कुरघोडीचे राजकारण यात जमीनअस्मानाचा फरक आहे. समाजकार्याचा पुढचा टप्पा म्हणजेच राजकारण. आणि राजकारणाची अधोगती म्हणजे कुरघोडीचे राजकारण. कोल्हापूरात राजकारणापेक्षा कुरघोड्यांच्या राजकारणाला खूप महत्त्व आहे. कुणाला कुरघोडीचे राजकारण शिकायचे असेल तर कोल्हापूरात सहा महिने रहायला यावे. त्यापैकी चार महिने महापालिकेत काढले की तो कुरघोडीच्या राजकारणात मातब्बर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महापालिका म्हणजे कुरघोडीच्या राजकारणाचा अड्डा आहे.

(जाहिरात – ✍🏼 आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

🏢 २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

👥 ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

🚩 पत्ता खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.

📞 फोन – (०२३१) २६२७५७९)

महापालिकेचे राजकारण भल्याभल्यांना कळत नाही, उमगत नाही. इथे प्रत्येकाचे हितसंबंध गुंतले आहेत. अधिकारी, पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी या सर्वांनाच महापालिकेच्या राजकारणात भारी इंटरेस्ट. विविध पक्षांचं, आघाड्यांचं आणि गटातटाच्या राजकारणाचा भरणा महापालिकेत अधिक असतो. महापालिकेचा नगरसेवक होण्यापासून इथे कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात होते. समाजसेवेपेक्षा व्यक्तीगत स्वार्थ पाहिला जातो. मुखवटा आणि चेहरा यात भलताच घोळ असतो. महापालिकेची रचना करताना नियमावली आहे. या नियमावलीलाच बासणात गुंडाळून राजकारण कसे करावे, याचे बाळकडूच महापालिकेत मिळते. कालपरवा पर्यंत साधाभोळा वाटणारा महापालिकेत आला की संपूर्णतः बदलून जातो. राहणी बदलते, रुबाब वाढतो.

मतदारांच्या नजरेत हे सारे येत असते. आणि आपला पठ्ठ्या मातब्बर राजकारणी झाला हेही त्याच्या लक्षात येते. महापालिकेचा कारभार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. पण महापालिकेतील काही मुरब्बी कारभारी त्यात भलतेच तज्ञ आहेत. ते आर्य चाणक्याचे बाप आहेत. कारभार कसा करायचा याची नाडीच त्यांना गवसली आहे.

महापालिकेच्या नियमावलीनुसार काम केले असे दाखवले जात असले तरी नियमांची मोडतोड केली जाते. अनेकदा झालेल्या सभांचे इतिवृत्त विशिष्ट वेळेत लिहून पुर्ण करणे आवश्यक असते. पण या क्षणाला जरी पाहिले तर किती सभांचे इतिवृत्त पुर्ण आहे. हे लक्षात येईल. ऐनवेळेच्या विषयाशिवाय सभागृहात मंजूर किंवा चर्चा न झालेले ठराव इतिवृत्तात कसे घुसडले जातात हे सामान्यांनाच नव्हे तर सदस्यांनाही समजत नाही.

पदाधिकारी निवडी करताना कुरघोडीच्या राजकारणाला ऊत येतो. हा माझा, हा माझ्या गटाचा यातूनच कुरघोडीला सुरुवात होते. पण प्रत्यक्षात पाठीत कधी खंजीर खुपसला हे समोरच्यालाही कळत नाही. आज (शुक्रवार) झालेल्या महापौर निवडीतही अशाच कुरघोड्यांचे राजकारण झाले. पक्षाचे नेतेही हतबल झाले. स्वकियांना सांभाळता सांभाळता विरोधकांनाही सांभाळण्याची वेळ आली. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आणि बहुमत आहे. असे असून देखील महापौर निवडीवेळी नेत्यांना ठाम भूमिका घेता आली नाही. विरोधकांनी काहीही न करता आपला डाव साधला. अमूक एखाद्याला उमेदवारी दिली तर आम्ही ताकदीने निवडणूक लढवू असा इशारा भाजप-ताराराणी आघाडीने दिला. दगाफटका होऊ नये, याची खबरदारी घेत निर्णय घ्यावा लागला. एकुणच काय महापालिका म्हणजे कुरघोडीच्या राजकारणाचा अड्डा आहे, हेच यावरुन स्पष्ट झाले.  

ठसकेबाज…

774 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा