Breaking News

 

 

नागांवमध्ये पोषण आहाराचा पुन्हा बट्ट्याबोळ…

टोप (प्रतिनिधी) :  कुपोषणावर मात करुन सदृढ बालके बनविण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून शासनातर्फे गरोदर महिला, स्तनपान करणारी ६ महिन्यांपासून ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी पोषण आहार योजना राबविली जाते. पण शासनाच्या या सकस आहाराने बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे चित्र दिसत आहे.

अंगणवाडीमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या आहारात टॉप कुक मीठ घातले जाते. पण हे मीठ रांगोळी मिश्रित (राहळ) घटक असल्याने हे पाण्यामध्ये विरघळत नसल्याचे आज (शुक्रवार) नागांव (ता.हातकणंगले) येथे निदर्शऩास आले. कुपोषणावर मात करण्यासाठी शासनाकडून बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

मात्र, अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषक आहार नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. शासनाने आहारा विषयी ज्या-ज्या कंपन्याना ठेका दिला त्यांची गुणवत्ता शासनाकडून तपासली पाहीजे. पण शासनाकडून असे होत नसल्याचे निकृष्ट दर्जाचा आहारावरुन दिसत आहे. तसेच या मीठाच्या पाकिटावर गुजरातच्या कंपनीचा पत्ता आहे.

633 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा