Breaking News

 

 

गर्भवतींच्या आरोग्यावर होणाऱ्या सुश्राव्य संगीताच्या परिणामावर संशोधन : डॉ. सतीश पत्की

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुश्राव्य संगीताचे मानवी आरोग्यावर होणारे फायदेशीर परिणाम या विषयावर आजवर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच संशोधन झाले आहे. अशाच संगीताचा फायदा गरोदर माता तसेच गर्भाशयामध्ये वाढणारे अर्भक यांच्या आरोग्यावर होतो का या विषयावरील संशोधन पत्की हॉस्पिटल येथील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात सुरु होत आहे. एक जुलै रोजी ‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून या संशोधन प्रकल्पाची मूहूर्तमेढ रोवणार असल्याची माहिती डॉ. सतीश पत्की यांनी दिली.

पत्की म्हणाले की, देशातील संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचा  शुभारंभ होणार आहे. प्राचीन काळापासून संगीताचे मानवी आरोग्याशी फार जवळचे नाते आहे. प्लुटो या विचारवंताने म्हटले आहे की, औषधामुळे शारीरिक विकार बरे होतात तर संगीतामुळे मानसिक संतुलन सुधारते. मधुर संगीताच्या श्रवणामुळे मेंदूमधील सर्वच केंद्रांना उत्तेजन मिळते व शारीरिक तसेच मानसिक आरोग्याला चांगली चालना मिळते. चांगले संगीत ऐकल्यानंतर मेंदूमधून इंडॉर्फिन व डोपामाइन या अंत:स्त्रावाची निर्मिती होते. या सर्वांमुळे मनामध्ये चांगले भाव निर्माण होतात व ‘फील गुड’ वातावरणाची निर्मिती होते. हृदयाचे विकार रक्तदाब श्वसनाची गती पचनसंस्था व भावनांचे योग्य नियोजन या सर्वांसाठी चांगले संगीत ऐकणे हा एक महत्त्वाचा उपचार समजला जातो. या पार्श्‍वभूमीवर सुश्राव्य संगीत ऐकण्याचे फायदे गरोदर महिला तसेच अर्भकावर काय होतील अशी उद्दिष्टे समोर ठेवून या प्रकल्पाचे पत्की हॉस्पिटलमध्ये नियोजन केले आहे.

गर्भवती महिलेची मानसिक स्थिती सुदृढ आनंदी व प्रसन्न ठेवण्यासाठी संगीत निश्चित उपयोगी ठरेल माता व अर्भकाच्या जडणघडण यामध्ये संगीताचा किती फायदा होईल याचे संशोधन करण्यात  येणार आहे. निवडक शिष्य संगीत ऐकण्याचे मार्गदर्शन प्रस्तुत तज्ज्ञ व संगीत पद हे यांच्याद्वारे काही गरोदर महिलांना केले जाईल व त्यांच्या चाचण्या करून निष्कर्ष काढले जाणार आहेत असा हा वैविध्यपूर्ण ध्येय ठेवून केलेला संशोधन प्रकल्प हा देशांतर्गत होणाऱ्या संशोधनामध्ये जगावेगळा असून संशोधन क्षेत्रामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल असा विश्वासही डॉ. पत्की यांनी व्यक्त केला.

1,368 total views, 6 views today

2 thoughts on “गर्भवतींच्या आरोग्यावर होणाऱ्या सुश्राव्य संगीताच्या परिणामावर संशोधन : डॉ. सतीश पत्की”

  1. Great job Dr patki is going to do.its our pleasure dr.pls send the result in short.thank u sooooo much dr.congratulations and our all wishes r with u Dr.AL THE BEST.

  2. Great job Dr patki is going to do.its our pleasure dr.pls send the result in short.thank u sooooo much dr.congratulations and our all wishes r with u Dr.AL THE BEST.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा