Breaking News

 

 

कोल्हापुरात ‘डॉक्टर डे’निमित्त संगीतकार प्यारेलाल यांच्या उपस्थितीत रंगणार संगीत सोहळा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने १ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.  यावर्षी केमए आर्ट सर्कलच्या वतीने  संगीत सोहळ्याचे आयोजन १ जुलै रोजी केले आहे. ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात या सोहळ्यास सुरुवात होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

(जाहिरात – 🎓  शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो, 🔹  आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

🏫  चाटे शिक्षण समूह

📌  लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

📲  प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

यावर्षीचा हा २० वा ‘डॉक्टर डे’ असून हिंदी चित्रपटातील प्रख्यात संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीतावर आधारित ‘मेरे दिल मे आज क्या है’ या संगीत  नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी स्वतः संगीतकार प्यारेलाल शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सन २०२३ – २४ हे मेडिकल असोसिएशनचे शताब्दी वर्ष असणार आहे. त्यासाठी पुढील चार वर्षे वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याची सुरुवातही या एक जुलैच्या डॉक्टर्स डे संगीत सोहळ्याने करीत असल्याचे डॉ. उद्धव पाटील यांनी सांगितले.

डॉक्टरांचा अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून गेली वीस वर्षे मेडिकल असोसिएशनच्या आर्ट सर्कलमार्फत विविध संगीताचे कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये डॉक्टर कलाकार उस्फूर्तपणे सहभाग घेतात. यावर्षीचा संगीत सोहळाही रंगतदार होणार असल्याचे डॉ. अमर आडके यांनी सांगितले.

यावेळी सचिव डॉ. आशा जाधव, डॉ. राजेंद्र वायचळ,  डॉ.ए.बी.पाटील, डॉ.रविंद्र शिंदे, डॉ.संजय घोटणे, डॉ. अजित चांदेलकर, डॉ. सोपान चौगुले, डॉ. प्रिया शहा, डॉ.पी.एम.चौगले आदी उपस्थित होते.

726 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा