Breaking News

 

 

कोलकातामधून इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक…

कोलकाता (वृत्तसंस्था) :  कोलकातामधून शीघ्र कृती दल (एसटीएफ) ने बांगलादेशी दहशतवादी संघटना नियो-जमियतुल मुजाहिद्दिन बांगलादेश आणि इस्लामिक स्टेटच्या (इसिस) चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी तीन नियो-जमियतुल मुजाहिद्दिन बांगलादेश आणि एक इसिसचा संशयित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.

या अटक केलेल्या संशयितांकडून मोठ्या प्रमाणात आपत्तीजनक सामुग्रीही जप्त करण्यात आली आहे. यातील दोन संशयिताना काल (सोमवार) सियालदाह रेल्वे स्थानकाजवळून अटक करण्यात आली. तर अन्य दोन संशयितांना हावडा रेल्वे स्थानकावरून आज (मंगळवार) अटक करण्यात आली. तसेच आणखी एका भारतीय नागरिकालाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला. त्यामध्ये जिहादशी निगडीत अनेक फोटो, व्हिडीओ, मेसेजसही सापडले आहेत.

नियो-जमियतुल मुजाहिद्दिन बांग्‍लादेश या संघटनेचे संशयित दहशतवादी भारतात आपल्या संघटनेसाठी पैसा गोळा करत होते. तसेच आपल्या संघटनेसाठी लोकांची भरतीही करत होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

162 total views, 15 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा