Breaking News

 

 

‘बीएसएनएल’चा पाय आणखी खोलात..! : केंद्र सरकारकडे मदतीची याचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने केंद्र सरकारकडे मदतीसाठी धाव घेतली असून कंपनीचा कारभार पुढे कायम सुरु ठेवण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. बीएसएनएलने केंद्र सरकारकडे मदत करण्याच्या विनंतीचे पत्र पाठवले आहे. रोख रकमेची कमतरता असल्याने कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा ८५० कोटींचा पगार देणं कठीण असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. यासोबत १३ हजार कोटींची देणी थकली असल्याकारणाने कंपनीचा व्यवसाय सध्या अस्थिर आहे.

बीएसएनएलचे सीनिअर जनरल मॅनेजर पूरन चंद्र यांनी दूरसंचार विभागाच्या संयुक्त सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘दर महिन्यात महसूल आणि खर्चात असणाऱ्या अंतरामुळे कंपनीचं कामकाज सुरु ठेवणं चिंतेचा विषय बनला आहे. कारण सध्या एका अशा ठिकाणी पोहोचलो आहेत जिथे पुरेशा इक्विटीचा समावेश केला नाही तर बीएसएनएलचं कामकाज सुरु ठेवणं जवळपास असंभव आहे.

कंपनीसमोर सध्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर सोयी-सुविधा सर्वात मोठी समस्या ठरत आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

507 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा