Breaking News

 

 

अश्विनी बिद्रे खूनप्रकरण : संशयितांवरील आरोप निश्चित

मुंबई (प्रतिनिधी) : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याची सुनावणी अलिबाग येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. यामधील आरोपींवर आरोप निश्चितीबाबत सोमवारी सुनावणी झाली. आरोपींविरोधात 302, 201, 120 (ब), 218, 417, 465, 468, 471 ही कलमे लावण्याचे न्यायालयाने ठरविले आहे. त्यामुळे या कलमाच्या आधारे आता खटल्याची पुढची सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे.

बिद्रे खून प्रकरणाचा खटला अलिबाग सत्र न्यायाधीश आर. जी. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्यामध्ये आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबतचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी आधीच्या सुनावणीत केला होता. त्यावर सोमवारी न्यायालयाने आरोपींविरुद्ध संघटितपणे कट रचून खून करणे, पुरावा नष्ट करणे, फसवणूक करणे, खोटे पुरावे तयार करणे, पोलिसांची दिशाभूल करून तपासास अडथळा निर्माण करणे या कलमांचा समावेश केला आहे.

या खटल्यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यावतीने त्याचे वकीलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्जही न्यायालयाने निकाली काढला आहे. या खटल्याला आरोपी वगळता विशेष सरकारी वकील, आरोपी पक्षाचे वकील, पोलीस हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा