Breaking News

 

 

एचआयव्हीबाधितांना आता एस. टी. प्रवास मोफत !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुर्धर आजाराने (एचआयव्ही/एड्स) त्रस्त व्यक्तींना त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय,  उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय येथे प्रवास करणेसाठी प्रती प्रवास ५० किमी १०० टक्के विनामूल्य करण्यास सवलत दिली आहे. महाराष्ट्र राज्य व परिवहन महामंडळ यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.

एचआयव्ही संसर्गीत व्यक्तींना आरोग्य टिकवण्याकरिता आयुष्यभर ए. आर. टी. उपचारांची गरज भासते. ही औषधे सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात. या औषधांकरिता रुग्णास नियमित ए. आर. टी. सेंटरला फेऱ्या माराव्या लागतात. आधीच हलाखीची स्थिती असणाऱ्या रुग्णास प्रवास खर्च झेपत नसल्याने हे उपचार थांबले जातात. परिणामी नियमित औषधे न घेतल्याने मृत्यूचा धोका वाढतो.

कोल्हापूर एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि विहान(एन के पी प्लस) यांनी एकत्रित रित्या मोफत एस.टी बस प्रवासासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता. पण तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गीत लाभार्थी वंचित राहिले होते. त्यामुळे हा विषय जिल्हा एड्स नियंत्रण समितीपुढे मांडण्यात आला. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतच्या तांत्रिक अडचणी ताबडतोब सोडवण्याविषयी विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांना सूचना दिल्या. त्यानुसार पलंगे यांनी पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते लाभार्थीना सुरुवातीचे मोफत बस पास चे वितरण केले गेले.

    या कार्यक्रमास जिल्हा एड्स नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपूरकर, एन.के.पी प्लसचे प्रकल्प समन्वयक संजय साऊळ, वैशाली बगाडे, सुनिता पाटील, अनिकेत खाडे, गीता माने, रविराज पाटील, संदीप कोले-पाटील यांची उपस्थिती होती.    

927 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा