Breaking News

 

 

लालूप्रसाद यादवांची कोट्यावधींची बेहिशेबी संपत्ती जप्त…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांना आयकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल ३.७ कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे. 

पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालू यादवांच्या मालकीच्या काही इमारती आहेत. या इमारतींची मालकी बेकायदेशीर असल्याचं आयकर विभागाच्या पाहणीत स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या इमारती जप्त करण्यात येणार आहेत. तसंच बिहार आवामी कोऑपरेटिव्ह बँकमधील लालू प्रसाद यादवांच्या कोट्यावधींच्या ठेवीही जप्त करण्यात येणार आहेत. 

लालू यादवांची संपत्ती जप्त होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही मोठ्या प्रमाणात त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दिल्लीतील बंगले आणि शेल कंपन्याही यावर्षी जप्त करण्यात आल्या आहेत. 

390 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा