Breaking News

 

 

रत्नागिरीत वॅरॉन कंपनीवर ईडीचा छापा…

रत्नागिरी (प्रतिनिधी) :  रत्नागिरी एमआयडीसी परिसरात असलेल्या वॅरॉन कंपनीवर ईडीने छापा टाकला. वॅरॉन इंडस्ट्रिजचे संचालक श्रीकांत सावईकर यांनी बनावट पतपत्रांद्वारे बँक ऑफ इंडियाला २९३ कोटींचा गंडा घातला होता. त्यामुळे फसवणूक, गुन्हेगारीचे कारस्थानासहीत आदी आरोप करीत बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी २०१७ मध्ये संचालकांविरोधात तक्रार दाखल केली होती. 

सीबीआयच्या बँकींग सुरक्षा आणि भ्रष्टाचार कक्षाकडे ही तक्रार नोंदवली गेली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच पुणे, सांगली, नागपूरसह सवाईकार यांच्या रत्नागिरीतील मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत.

204 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा