शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील शरद किडसमधील सहा विद्यार्थ्यांनी गणित ऑलिम्पियाड फाऊंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेत यश मिळवले.
यामध्ये तिसरीच्या मीरा पटेल, श्रेयस गळगे व अक्षरा भगाटे यांनी सुवर्णपदक मिळवले. तिसरीच्या आदिनाथ सिदनाळे, अर्णव भातमारे, मनन पटेल, तर चौथीच्या शुभ्रा पाटील यांनी स्टुडंट परफॉर्मन्स मिळवला. जगातील ३२ देशात ह्या परीक्षा होतात. यावर्षी देशातील ८५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.