Breaking News

 

 

पन्हाळा पोलीस ठाण्यातील हवालदार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात…

पन्हाळा (प्रतिनिधी) :  पन्हाळा ठाण्यातील पोलीस हवालदार बक्कल नं.१०४४ सतिश बापुसो खुटावळे (वय ५३, रा. इंगवले कॉलनी, फुलेवाडी, कोल्हापूर) याला १५००/- रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने पन्हाळा पोलीस ठाण्यातच आज (शुक्रवार) रंगेहात पकडले.

बांदिवडे पैकी धनगरवाडा (ता.पन्हाळा)  येथील तक्रारदार तुकाराम जानकर व त्याचे चुलते बंडा आबा जानकर यांच्याशी किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाची तक्रार तुकाराम जानकर यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात  दिली होती. त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नसल्याने तक्रारदार चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते.

त्यावेळी पोलीस हवालदार खुटावळे यांची भेट घेतली असता त्याने तुमचा गुन्हा अदखलपात्र आहे. त्यामुळे आरोपींवर कारवाई करण्यासाठी ३,००० रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी याबाबत लुचपत प्रतिबंधक खात्याकडे आज तक्रार केली होती. याची लाचलुचपत खात्याने या तक्रारीची शहानिशा केली. या पडताळणीत हवालदार खुटावळे यांनी अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे आढळले.

त्यानुसार त्यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यातच सापळा लावला. यावेळी तक्रारदार खुटावळे यांच्याकडे आले असता त्यांच्यात १,५०० रुपयांवर तोडगा ठरला. यावेळी हवालदार खुटावळे याला पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला शासकीय पंचांच्या समक्ष रंगेहात पकडले. हवालदार खुटावळे याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईत  पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस हवालदार  मनोज खोत, पोलीस नाईक शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, कॉ.मयूर देसाई, सूरज अपराध यांनी भाग घेतला.

3,741 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा