पंढरपूर प्रतिनिधी-

भविष्यात क्लास वन अधिकारी तयार करण्यासाठी स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षकांनी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब काळे यांनी केले.

पंढरपूरच्या तालुका प्राथमिक शिक्षक संघ व बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांनी इ. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षपदावरून बाळासाहेब काळे बोलत होते.

सदर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री रामभाऊ यादव यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्य संघाचे सल्लागार  बाळासाहेब काळे गुरुजी यांनी भूषवले प्रमुख उपस्थिती याप्रसंगी जिल्हा सोसायटीचे माजी चेअरमन  उत्तमराव जमदाडे, जिल्हा सोसायटीची माजी चेअरमन दादाराजे देशमुख,राज्य संघाचे संपर्कप्रमुख मारुतीराव क्षीरसागर,राज्य संघाचे उपाध्यक्ष संपतराव देशमुख,सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष  सरस्वती भालके,ज्येष्ठ मार्गदर्शिका विजया जावळे-देठे,कल्पना जगताप-भुसे,जिल्हा सोसायटीचे व्हाईस चेअरमन शेखर कोरके जिल्हा संघाचे उपाध्यक्ष  नारायण घेरडे,बाळासाहेब काळे सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय शिंदे,व्हाईस  चेअरमन दत्तात्रय वाघमारे, तालुका संघाचे सरचिटणीस राजकुमार जमदाडे,कार्याध्यक्ष विकास कांबळे,कोषाध्यक्ष राहुल आर्वे महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष वैशाली आहेर,सरचिटणीस सुप्रिया कांबळे,उपाध्यक्ष गीता माने इत्यादी उपस्थित होते.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक अर्जुन नाना अवताडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तसेच शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका सुचिता पाटील यांचाही गौरव करण्यात आला सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेली शिक्षक अमरजा काळे,कल्पना अवताडे,बंडू देवळे यांचा सत्कार करण्यात आला आदर्श शाळा गुरसाळे,तनाळी मुंडेवाडी या शाळेचे मुख्याध्यापक नबीलाल परकाळे, कल्याण कुंभार, राजेंद्र डुबल यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थी मनोगतामध्ये हर्षवर्धन खडतरे यांनी अभ्यास कसा करावा, किती वेळ अभ्यासासाठी द्यावा आणि कसं यश मिळवावं याबाबत मनोगत व्यक्त केलं. अर्जुन अवताडे यांनी मनोगतामध्ये शिष्यवृत्तीला विद्यार्थी आणण्यासाठी पहिलीपासून वर्गाची तयारी करून घेतली, कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाइन तास घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली याबाबत सविस्तर माहिती सांगितली. अधिक प्रयत्न करत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब काळे पतसंस्थेचे संचालक  पांडुरंग नाईकनवरे,  शांताराम गाजरे  महादेव बागल,  दिनकरराव खांडेकर , नारायण घेरडे, नबीलाल परकाळे,तालुका संघाचे उपाध्यक्ष  हनुमंतराव पवार तालुका सोसायटीचे संचालक आनंदराव भुसे,ज्येष्ठ मार्गदर्शक सिद्धनाथ भंडारे,लक्ष्मण भुसे,सुभाष धोत्रे,बाळु धुमाळ,उत्तम बंडगर,आण्णासाहेव पवार, संघाचे शिलेदार सुधाकर शिंदे,मदन गवळी,पुरुषोत्तम सांगले,सतीश शिंदे,दादा गायकवाड,संदीप आहेर इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले. सदर गुणगौरव कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राहुल आर्वे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार दत्तात्रय वाघमारे यांनी मानले.