Breaking News

 

 

सचिन, लक्ष्मण, गांगुलीला क्रिकेट मंडळाच्या लोकपालांचा ‘हा’ इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉमेंट्री किंवा आयपील दोहोंपैकी एकच काहीतरी निवडा, असा इशारा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डी. के. जैन यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दिला आहे. हे तिघेही आयपीएलमधील काही संघांशी जोडले गेले आहेत. मग ते विश्वचषकात समालोचक म्हणून कसे काम करू शकतात, असा आक्षेप  डी. के. जैन यांनी नोंदवला आहे. त्यांच्या या आक्षेपानंतर हे प्रकरण बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडे जाऊ शकते. 

हे तिघेही सध्या क्रिकेट विश्वचषकात समालोचन करत आहेत. आयपीएलमधील एखाद्या संघाशी हितसंबंध असणारे माजी क्रिकेटपटू विश्वचषकात समालोचन कसे करु शकतात? त्यांनी अजूनही क्रिकेटमधून संन्यास घेतलेला नाही. मग ते समालोचकाची भूमिका कशी पार पाडू शकतात, असा सवाल डीके जैन यांनी केला. या प्रकारामुळे लोढा समितीने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. कारण समितीच्या नियमांनुसार एका खेळाडूला एकच पद मिळू शकते, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. 

जैन यांच्या आक्षेपामुळे हरभजन सिंह आणि पार्थिव पटेल हे देखील अडचणीत आले आहे. हे दोघेही विश्वचषक स्पर्धेत समालोचक म्हणून काम करत आहेत. आयपीएलच्या मागील हंगामात हे दोघे आपापल्या संघांकडून मैदानातही उतरले होते. याविषयी बोलताना प्रशासकीय समितीच्या एका सदस्याने सांगितले की, आमची समिती जैन यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांविषयी विचारविनिमय करत आहे. यावर लवकरच काहीतरी तोडगा काढण्यात येईल. 

381 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा