Breaking News

 

 

गोलरक्षकासाठी निर्णय क्षमता महत्वाची : सुखदेव पाटील

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : फुटबॉल गोलरक्षकाला सर्वाधिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मुख्य बचावासह अत्याधुनिक खेळात  आक्रमणातही  बजवावी लागते. त्यासाठी निर्णय क्षमता सर्वाधिक महत्वाची असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय गोलरक्षक सुखदेव पाटील यांनी केले. ते गडहिंग्लजमध्ये बोलत होते.

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे गोलकिपर प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी खेळाडू महादेव पाटील होते. गेले दहा दिवस घेण्यात आलेल्या या शिबिरात सुखदेव पाटील यांनी गोलरक्षकाना मार्गदर्शन केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपनावर यांनी शिबिरात घेण्यात आलेल्या कौशल्यांचा आढावा घेतला.

सुखदेव पाटील म्हणाले की, फुटबॉलचे तंत्र दिवसेंदिवस बदलत आहे. त्यामुळे गोलरक्षकाचे महत्व आणखी वाढले आहे. सरावातील सातत्य आणि तंदुरुस्तीच्या जोरावर उत्कृष्ट गोलरक्षक होता येते. परंतू, याकडे फुटबॉलपटू गोलरक्षणाकडे पाठ फिरवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी तौसीन बोजगर, वाहिद मकानदार, यासिर मकानदार, त्रुतिक येसादे युनायटेडचे उपाध्यक्ष अरविंद बारदेसकर, प्रशांत दड्डीकर, सुरेश दास, सौरभ पाटील, संदिप गोंधळी, सागर पवार, ओमकार घुगरी, सुल्तान शेख यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.  

552 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा