Breaking News

 

 

कोल्हापूर महानगरपालिकेचा ‘लिडरशिप’ पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘ईएलईटीएस’ या संस्थेतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेस स्मार्ट गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत लिडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आज (गुरुवार) माहिती व संभाषण तंत्रज्ञान (आयसीटी) या विषयावर झालेल्या गव्हर्नन्स अँड पीएसयू शिखर परिषदेत इलेट्स टेक्नोमेडिया प्रा. लि. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी गुप्ता यांच्या हस्ते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या परिषदेत आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी कोल्हापूर महापालिकेंतर्गत विविध विभागांद्वारे कार्यालयीन कामकाजात माहिती व संभाषण तंत्रज्ञान  (आयसीटी) चा वापर करून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधांचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सल्लागार श्वेता शालिनी, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

252 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा