Breaking News

 

 

पाटपन्हाळ्यात विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू…

बाजार भोगाव (प्रतिनिधी) : जनावरांना शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या पाटपन्हाळा (ता. पन्हाळा) येथील कोंडिराम दाजी गुरव (वय ५५) या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

शेतकरी कोंडीराम गुरव हे  सकाळी साडेसातच्या सुमारास रिंगडी नावाच्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी दोन शेतकऱ्यांंसोबत गेले होते. त्या शेतात झालेल्या जोरदार पावसामुळे विजेची तार तुटून उसामध्ये पडली होती. यावेळी गुरव यांना वैरण काढीत असताना त्यांना ती पडलेली वीजेची तार न दिसल्याने त्यांच्या हाताचा  स्पर्श तारेला झाला. त्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसला. त्यांच्या ओरडण्याच्या  आवाजाने शेजारीच असणारे दोन शेतकरी त्यांच्या जवळ गेले असता गुरव हे तारेला चिकटलेले दिसले. त्या शेतकऱ्यांनी जवळच असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवरील विद्युत पुरवठा बंद केला. पण तोपर्यंत गुरव यांचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेचा पंचनामा कळे पोलीस स्टेशन आणि महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी  येऊन केला. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने लोंबकळणाऱ्या  तारा, शेतात पडलेले विजेचे डांब,  विजेच्या तारांची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

489 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा