Breaking News

 

 

भारताने फेटाळला पाकिस्तानशी चर्चेचा दावा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानबरोबर भारत चर्चेसाठी तयार असल्याचा दावा भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला होता की, भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी शेजारील राष्ट्राबरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर भारताकडून स्पष्ट करण्यात आले की, नवी दिल्लीच्यावतीने पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आलेली नाही.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की, भारताला पाकिस्तानसह आपल्या शेजारील देशांबरोबर साधारण आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानच्या शुभेच्छांना उत्तर देताना पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयाने सर्व शेजारी देशांबरोबर साधारण आणि शांतीपूर्ण संबंधाबाबत म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी विश्वासाचे व दहशतमुक्त वातावरण तसेच हिंसाचारपासून मुक्तीबाबत उल्लेख केले असल्याचे सांगितले.

360 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा